सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील नेरे-वरवडी ता.भोर रस्त्यावरील पुलावरून दुचाकी गाडी कोसळल्याने एक जनाचा मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवार दि.२ घडली.
वरवडी वरून भोरकडे येताना नेरे गावाजवळील वढ्यातील पुलावरून बसरापूर ता.भोर येथील दुचाकी चालक गाडीसह पुलावरून ओढ्यातिल पाण्यात कोसळले.या अपघातात बसरापूरच्या ५५ ते ६० वयाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नेरे गावातील तरुण तसेच ग्रामस्थांनी पूलात अडकुन मृत्यू झालेल्या व्यक्तीस बाजूला काढले तर दुसऱ्या जखमी व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.भोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे.
COMMENTS