बारामती ! मराठा आरक्षणासाठी वाढता पाठिंबा : वाघळवाडीत, वाणेवाडी व मुरूममध्ये कँडल मार्च तसेच साखळी उपोषण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांना बारामतीच्या पश्चिम भागातून मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. निंबूत, वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, सोरटेवाडी, वडगाव येथील ग्रामस्थांच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच "चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष",तसेच "एक मराठा लाख मराठा” आदी फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच वरील सर्व गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
        सर्वच ग्रामपंचायतीने तहसीलदार यांना निवेदन देत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याचे म्हटले आहे. साखळी उपोषणाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षण लागू करावे अशी मागणी तरुण करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी वाणेवाडी येथे आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.

To Top