Bhor News ! दि. १९ रोजी जरांगे पाटील भोरमध्ये : सभेला लाखोंची उपस्थिती राहणार, आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरला मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.१९ मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली असून लाखोंच्या घरात मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास भोर तालुका सकल मराठा संयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
    मराठा समाजाची ऐतिहासिक विराट सभा भोर शहरातील विद्यानगर येथील शेटे माळावर १८ एकरात आयोजित केली असून सभेच्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समाज बांधवांसाठी अल्पोपहार,पाणी,पार्किंग, सभा उशिरापर्यंत चालू राहिल्यास लाइटिंग तसेच दोन एलईडी ऑल लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर तालुक्यात पूर्णतः गावागावांमधील समाज बांधव सभेला येण्यासाठी फ्लेक्स बोर्ड लावून सभेला सभेच्या ठिकाणी येऊन सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सभेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी १५० स्वयंसेवक असून स्वागत,व्यासपीठ,आपत्कालीन, सुरक्षा ,आरोग्य ,नियंत्रण कक्ष समित्या नेमल्या आहेत महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून मुस्लिम समाज पाण्याची व्यवस्था करनार असल्याचे सकल मराठा तालुकाध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.यावेळी सचिव सारंग शेटे,सोमनाथ ढवळे,महेश शेटे,भालचंद्र मळेकर,दीपक शेटे,स्वामी धुमाळ, ओंकार शिवतरे, बाळा शेटे,एकनाथ रोमन, अड.धीरज चव्हाण,महेश भेलके,अमर चव्हाण उपस्थित होते.
                                        
To Top