सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे-पवार : स्वागताध्यक्षपदी हभप.जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या  सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ स्वाती शिंदे -पवार यांची निवड करण्यात आली आहे.  स्वागताध्यक्षपदी ह. भ. प. जगदीश महाराज उंद्रे यांची तर निमंत्रकपदी नितीन भागवत यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन भरविले जाते. 
संमेलनाध्यक्ष डॉ स्वाती शिंदे या गेली तीस वर्षे राज्यभर साहित्य चळवळीत सहभागी आहेत. वाटेवरती काचा गं हे त्यांचे कवितेचे पुस्तक विशेष गाजले. 
डॉ . स्वाती शिंदे - पवार
जिल्हा परिषद केंद्रशाळा मंगरूळ . ता. खानापूर
शिक्षण -एम.ए; एम.एड; पीएच.डी; डी .लीट .
मा.अधिसभा सदस्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार .

-साहित्यसंपदा -
१) स्त्रिकोष( एम.ए व्दितीय वर्ष अभ्यासक्रमात समावेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ,औरंगाबाद .) 
२) प्रेम म्हणजे प्रेमच ( महाराष्ट्र टाईम्स - बंडखोर कवयित्री)
३) वाटेवरती काचा गं
(इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात शिर्षक कवितेचा समावेश )
४)वेदनेच्या खोल तळाशी( बी.ए .भाग एक अभ्यासक्रमात पुस्तकातील जातं कवितेचा समावेश .स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड . )
५) माती मोकळी होताना( कवी अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर )
६) काळजासाठी काही ओळी(बी.ए. भाग -१ च्या अभ्यासक्रमात ५ कविता -स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड .)
७)मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल ( मिडीया रेकॉर्ड शिर्षक कविता )
८) अरुणोदय - समिक्षाग्रंथ(एम .ए . भाग 2 संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर. संदर्भग्रंथ व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय यादीत समावेश .
लेखनाला ऐंशीहून अधिक पुरस्कार. 
स्वागताध्यक्ष श्री उंद्रे हे अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून, वात्सल्य धाम गोशाळा ते चालवितात. ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे, साप्ताहिक ज्ञानलीला चे ते संपादक आहेत. निमंत्रक नितीन भागवत हे कामगार चे रहिवासी असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

 संमेलनास उद़्घाटक म्हणून  भारतीय जनता पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव उपस्थित राहणार आहेत.  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर, कवयित्री ललिता गवांदे उपस्थित राहणार आहेत. 
या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी १२,३० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ ३० वा. क्रांतीसूर्य महात्मा फुले या विषयावर डॉ जगदीश शेवते यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. 
यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार, अविनाश ठाकरे यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले, अरविंद जगताप, संजय सोनवणे, दिपक पवार, विजय तुपे, यांनी केले आहे,

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे-पवार : स्वागताध्यक्षपदी हभप.जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत
पुरंदर ! महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे-पवार : स्वागताध्यक्षपदी हभप.जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi3dg9mVIRcBp642ly3-usx9LPBrTXtncktApnhL4KoZxLVqrGEr9qKdIlSN6-Ni0a1XbljJPUeb9ebCKK5DJKRJvos1pdzySOtqWsMiMbHBbbu-zcgdEfTjS-rXqINyLL43DEGNJIqI_BeqN01pr_nsO9t6_ywuVIumPjD5-c4KF2-mqE3RHsYAVarIWTT
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi3dg9mVIRcBp642ly3-usx9LPBrTXtncktApnhL4KoZxLVqrGEr9qKdIlSN6-Ni0a1XbljJPUeb9ebCKK5DJKRJvos1pdzySOtqWsMiMbHBbbu-zcgdEfTjS-rXqINyLL43DEGNJIqI_BeqN01pr_nsO9t6_ywuVIumPjD5-c4KF2-mqE3RHsYAVarIWTT=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/11/blog-post_74.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/11/blog-post_74.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy