पुरंदर ! निरा येथील २७ वर्षीय विवाहतेची गळफास घेत आत्महत्या : लोणंद पोलीसात फिर्याद दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निकीता चैतन्य घुले हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे.
       या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, वाघळवाडी ता. बारामती येथील जालिंदर बबन सावंत वय ५० यांनी लोणंद पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार निरा येथील फिर्यादीची पुतणी निकिता चैतन्य घुले वय २७ हि लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी ॲडमिट असल्याचा फोन दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी फिर्यादी जालिंदर सावंत यांना आदित्य घुले यांनी करून तातडीने लोणंद येथे बोलावून घेतले. फिर्यादी लोणंद येथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेले आदित्य घुले व आबा घुले यांना निकिताच्या तब्येतीबद्दल विचारले असता त्यांनी तुमच्या पुतणीने घरामधेच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी दवाखान्यात जावून पाहिले असता त्यांना आपली पुतणी मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात जावून या घटनेबाबतची फिर्याद दिली असून लोणंद अधिक तपास करीत आहेत.
To Top