सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील श्रीपती नगर येथील प्रसिध्द उद्योजक यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकराने बंद घरातील बेडरूम मधील कपटावर चॉकलेटी बॅगमध्ये ठेवलेले ८ लाख रुपये चोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली.याची फिर्याद भोर पोलिसात रामचंद्र श्रीपती आवारे (वय ५४),रा.श्रीपतीनगर भोर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याकडे काही दिवसांपासून कामाला असणारा आरोपी संजय कुलकर्णी (वय -३७) रा.श्रीपतीनगर भोर( मूळ राहणार कोल्हापूर ) याने दि.८/१०/२३ ते १३/१०/२३ ला फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप उघडुन बेडरूम मधील लाकडी कपाटाचेवर ठेवलेल्या चॉकलेटी बॅगमधून ८ लाख रुपये चोरून लंपास केले. चोरी झाल्याची घटना फिर्यादी यांच्या चार ते पाच दिवसांनी लक्षात आली.या घटनेतील चोर पोलिसांना मिळून आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव करीत आहेत.
COMMENTS