सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेल्या सुपे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या नऊ उमेदवारांच्या लढतीत माजी जिल्हा परिषद सदस्यांचे पुतणे तुषार हिरवे यांनी प्रस्तापितांना धक्का देत ८६५ मते घेवुन विजयी झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी एल. एस. मुळे यांनी दिली.
माजी सरपंच स्वाती हिरवे यांचे पती तसेच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अनिल हिरवे आणि येथील बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल यांनी प्रतिष्ठेची केलेली लढत अखेर अपयशी ठरली.
तुषार हिरवे यांनी प्रभाग १, २ आणि ५ मधुन घेतलेली आघाडीच अनिल हिरवे यांना मागे टाकता आली नाही. त्यामुळे त्यांना एकुण ८०९ मतांवर थांबुन क्रमांक दोनवर रहावे लागले.
प्रभाग क्रमांक १ मधुन अश्विनी सकट, सुधीर बारवकर, प्रभाग २ मधुन विशाल चांदगुडे, वैष्णवी बारवकर, प्रभाग ३ मधुन सोमनाथ कदम, निलोफर तांबोळी, शफिक बागवान, प्रभाग ४ मधुन नयना जगताप, अश्विनी जाधव, शंकर शेंडगे तर प्रभाग ५ मधुन मयुरी लोणकर, पुजा निकाळजे आणि विलास वाघचौरे विजयी झाले.
दरम्यान नवनिर्वाचित सरपंच तुषार हिरवे म्हणाले की तळागाळातील सर्व घटकांना सोबत घेवुन गावचा विकास करण्यावर भर दिला जाईल. तसेच प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यातील सर्व कामे करण्याचा प्रयत्न करु असे हिरवे यांनी सांगितले.
.................................
COMMENTS