Baramati News ! तीन अपत्य असल्याचा फटका : चोपडज ग्रामपंचायतच्या सदस्या विद्या कोळेकर यांचे सदस्यत्व अपात्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सदस्या विद्या मारूती कोळेकर या तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सदस्यत्वासाठी अपात्र ठरल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुनावण्या घेतल्यानंतर याबाबतचा आदेश दिला आहे.
       विद्या कोळेकर या चोपडज ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडणुकीव्दारे निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरोधात सुधीर दिलीप गाडेकर, जयश्री संदीप गाडेकर व स्वाती राजेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. २००५ नंतर जन्मलेली व हयात असलेली तीन अपत्ये असल्याचे कारण देत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अर्जाव्दारे केली होती. याबाबत ग्रामसेविका रंजना आघाव, अंगणवाडी सेविका वि. ना. कारंडे यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते. 
कोळेकर यांनी दोन मुली जुळ्या असल्याचे म्हणणे सादर केले होते, मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या तिन्ही अपत्यांच्या जन्मतारखा वेगळ्या असल्याचा चौकशी अहवाल ग्राह्य धरून निकाल दिल्याचे तक्रारदारांच्या वतीने अॅड. इम्रान खान यांनी काम पाहिले. 
दरम्यान, विद्या कोळेकर यांनी, सदर निकाल अमान्य असल्याने वरीष्ठ कार्यलायाकडे अपिल करणार असल्याचे स्पष्ट केले. 
----------
To Top