सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी नंतर दोन गट भिडले. यामध्ये अनेक चारचाकी गाड्यांची तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
निवडणुकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांचा स्वस्वयंभू परिवर्तन पॅनेल व उद्योजक डी पी जगताप यांचा श्री स्वयंभु हिराबाई माता पॅनेल आमने सामने उभे होते. या निवडणुकीत दुर्योधन भापकर यांच्या पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार जालिंदर भापकर हे निवडून आले. त्यांनी डी पी जगताप यांच्या पॅनेलचे उमेदवार संजय भापकर यांचा ५१ मतांनी पराभव केला.
जागा जिंकलेला श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते विजयानंतर देवदर्शनाला निघाले होते. येथील गावची यात्रा आहे, याचवेळी श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेल यांचे कार्यकर्ते देवदर्शनाला आले. समोरासमोर आल्यानंतर सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर दगडफेक झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यामुळे गावच्या यात्रेतच तणावाची स्थिती निर्माण झाली. काही वाहनांचे या घटनेत काचा फुटून नुकसान झाल्याची माहिती मिळाली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.