सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात करंजेपूल गावच्या मतदारांनी पुन्हा एकदा गावकारभारी पॅनलच्या विरोधात उभ्या असलेल्या पूजा वैभव गायकवाड या उमेदवारास सरपंचपदी निवडून दिले. त्यांनी गावकरी पॅनलच्या नम्रता सागर गायकवाड यांचा २२ मतांनी निसटता पराभव केला.
दरम्यान करंजे मध्ये भाऊसाहेब हुंबरे यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकत १४३ मतांनी सरपंच केले. मगरवाडी येथे सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवत मतदारांनी विनिता हगवणे यांना १६५ मतांनी तर चौधरवाडी गावात शशांक पवार यांना २२ मतांनी सरपंचपदावर बसविले. करंजेपुल, करंजे, चौधरवाडी येथे प्रस्थापितविरोधी कल दिसून आला तर मगरवाडीत मात्र सत्ता कायम राहिली.
करंजेपुल येथे गावकऱ्यांच्या सोमेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व सोमेश्वर चे माजी संचालक रमाकांत गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पाजी गायकवाड, सोमेश्वर चे संचालक ऋषी गायकवाड, अनिल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, ज्येष्ठ नेते नामदेव गायकवाड, किरण आळंदीकर, बबन पवार आदींनी केले. या विरोधात सोमेश्वर चे माजी संचालक विशाल गायकवाड व विद्यमान सरपंच वैभव गायकवाड माजी सरपंच बंडा गायकवाड यांनी सोमेश्वर विकास पॅनल च्या वतीने आव्हान उभे केले होते. परिवर्तन पॅनलच्या नम्रता सागर गायकवाड यांना एकूण ८६६ मते पडली. तर सोमेश्वर विकास पॅनलच्या पूजा वैभव गायकवाड यांना ८८८ मते मिळाली. शेंडकरवाडी प्रभागने १०१ मतांचे निर्णायक मताधिक्य देत पूजा गायकवाड यांना २२ मतांनी विजयी करण्यात किंगमेकर ची भूमिका बजावली दरम्यान परिवर्तन पॅनलचे सर्व सात सदस्य निवडून आले आहेत त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
दरम्यान मगरवाडी येथे सर्वसात सदस्य बिनविरोध निवडून आले होते. सोमेश्वर चे संचालक संग्राम सोरटे, माजी सरपंच संतोष कोंढाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवार विनिता लक्ष्मण हगवणे यांनी नवख्या उमेदवार व हनुमंत मगर यांच्या सुनबाई अंकिता अजय मगर यांचा १६५ मतांनी पराभव केला. दरम्यान करंजे येथे सरपंच पदासाठी नऊ जण उभे होते. मात्र मुख्य लढत भाऊसाहेब हुंबरे व भाऊसाहेब गोरे यांच्यातच झाली भाऊसाहेब हुंबरे यांनी १४३ मतांनी अखेर बाजी मारली. या विद्यमान सरपंच जया गायकवाड यांचे पती व माजी सरपंच संताजी गायकवाड यांचा सदस्य पदासाठी दारुण पराभव झाला चौधरवाडी येथे देखील ज्येष्ठ संपतराव पवार यांच्या विरोधात शशांक पवार यांनी मोट बांधली. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकत बावीस मतांनी निवडून दिले.
कोऱ्हाळे खुर्द येथिल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटचा पराभव झाला आहे. प्रस्थापितांची १५ वर्षांची सत्ता मतदारांनी उलथून टाकत नवनिर्वाचितांच्या हाती दिली आहे. माजी सरपंच धनंजय खोमणे, राहुल खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली गेली विरोधी सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष व येथील माजी सरपंच प्रणिता मनोज खोमणे, माजी सरपंच गोरख खोमणे, उद्योजक शरद खुडे, डॉ. मनोज खोमणे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला फक्त दोन सदस्य निवडुन आले आहेत.
मूढाळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता बदल झाला असून पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर वाबळे यांच्या नेतृत्वाखाली मेहमान गटाच्या मुर्ढेश्वर परिवर्तन पॅनेलने सत्ता काबीज केली आहे. जयपाल साळवे यांची सरपंच पदी निवड झाली आहे. याठिकाणी सागर वाबळे यांच्या सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडाला आहे. त्यांचे महेश सकाटे पराभूत झाले आहेत.अपक्ष नितीन पोटे व शांताराम साळवे यांनी लक्षणीय मते घेतली. त्यामुळेच वाबळे गटाचा उमेदवार पराभूत झाल्याचे बोलले जात आहे
COMMENTS