सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सहा दिवसापुर्वी तरुण मुलगी दिवसाढवळ्या गायब होते. संबंधित तक्रार दाखल करून देखील वडगाव निंबाळकर पोलीसांना पाझर फुटला नाही. निवडणुकीचे कारण देत सहा दिवस तपास बंद ठेवला आहे. तर दुसरीकडे संबंधित मुलीच्या आई वडिलांच्या टाहो फोडला आहे. त्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीसांच्या कार्यपद्धतीवर समाजातुन नाराजी दिसत आहे.
भैय्या हमको बचाओ ... मोठ मोठ्याने संतोष पांडे व त्याची पत्नी बेबी पांडे हे परप्रांतीय कुटुंब टाहो फोडत आहे. सहा दिवसापुर्वी दि. ३१ रोजी मंगळवारी त्यांची तरुण मुलगी गायब झाली. चार पाच हेलपाटे घातल्यावर तीन दिवसानी तक्रार घेतली खरी पण निवडणुकीचे कारण देत तपास करायला वेळ नाही असे उर्मट उत्तर पत्रकारांना अधिकारी देतात याहुन या पोलीसांची अकार्यक्षमता किती आहे हे दिसुन येते .
वास्तवीक तक्रार दाखल होताच पोलीसांनी फोन कॉल रेकॉर्ड तपासुन तातडीने तपास करणे गरजेचे होते. मात्र अद्याप सी डी आर चे पत्र देखील तयार झाले नाही अन्न पाण्यावाचुन आई वडील सहा दिवस करंजेपुल पोलीसांच्या दारात हेलपाटे घालत आहेत. त्यांच्या डोळयात ले पाणी आटत नाही. एका पारधी समाजातील देखील मुलगी गायब प्रकरण आहे त्याचा ही अजून तपास नाही. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पुर्वीचे स पो नि कुठलीही घटना घडताच तीन चार तासात आरोपीला परप्रांतातून जेरबंद करणारे होते. ए पी आय सोमनाथ लांडेनी तर फलटण ला गोळ्या लागल्या तरी आरोपी सोडले नाहीत मात्र अलिकडे अवैद्य धंद्याच्या रोज बातम्या येत आहेत. या परिसरात सुपे पोलीस स्टेशन झाल्यावर हदीतील गावे कमी झाली उलट जास्त वेगाने काम व्हायला पाहीजे होते मात्र सगळाच सावळा गोंधळ असल्याचे दिसत आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यानी महिला आयोगाच्य रुपाली चाकणकर यांचेशी संपर्क साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत देखील बातमी कळवली आहे. ऱाज्य सरकारने नुकतीच संकटात असलेल्या महिलांसाठी एक नंबर देवुन १०९१ वर कॉल केला तर त्वरीत पोलीस हजर होतील असे आवाहन केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार प्रयत्न करतेय तर दुसरीकडे वड्गाव निंबाळकर पोलीसांची "मला काय त्याचे "अशी भुमीका घेतल्याने महिलांच्या सुरक्षिततेला धोकाच पोहोचवत आहे अशी परिस्थीती आहे.
सबंधित आईवडीलांना न्याय त्वरीत न मिळाल्यास सोमेश्वरनगर मधुन सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
COMMENTS