सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात रविवारी ( दि. २६ ) संविधान दिन साजरा करण्यात आला.
येथील विद्यालयात महामनव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या एस. ए. लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपशिक्षक आर. जे. चव्हाण यांनी संविधान निर्मितीचा इतिहास आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीत सादर केला. येथील उपशिक्षिका एस. ए. मदने यांनी उद्देशिकेचे वाचन केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात घोषणा फलक देण्यात आले. तसेच संपूर्ण गावामध्ये संविधान फेरी काढण्यात आली. त्यानंतर ‘संविधानाचा विजय असो’ 'आपले संविधान –आपला अभिमान’ या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.
दरम्यान २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, शिपाई व निरपराध व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक बी. के. भालेराव उपस्थित होते. तर सुत्रसंचालन एम. एस. गायकवाड यांनी केले.
....................
COMMENTS