सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या भारतरत्न पदयात्रेचे निरेत स्वागत करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष विरू बाप्पू फाळके व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांसह अण्णाभाऊ साठेंचे जन्मभूमी विटा ते मुंबई कर्मभूमी अशी भारतरत्न यात्रा आयोजित केले आहे.
दि. २४ रोजी सकाळी साडेदहा वाजता या यात्रेचे निरीमध्ये जंगी स्वागत करून लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे विचार मंच यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन यात्रेचे स्वागत करण्यात आले निरा गावच्या वतीने राजेश भाऊ काकडे यांनी पाठिंबा देऊन मनोगत व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान अध्यक्ष सुनील आण्णा पाटोळे तसेच लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रमुख प्रशांत भैया पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा देऊन देण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे दादासाहेब गायकवाड सुनील चव्हाण ग्रामपंचायत सदस्य ठोंबरे साहेब ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ग्रामपंचायत व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विशाल जाधव दीपक जाधव रमेश वाघमारे सचिन ठोंबरे यांनी स्वागत करून आभार मानले
COMMENTS