Khandala News ! देवाच्या यात्रेनिमित्त फटाके वाजवण्याच्या कारणावरून मारहाण : दोघांविरुद्ध लोणंद पोलीसात गुन्हा दाखल

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद ता.खंडाळा येथील दोघांवर फटाके वाजवण्याच्या कारणावरून रात्री अकराच्या सुमारास लोखंडी राॅडने मारहाण केल्याची फिर्याद लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे.
         याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी, लोणंद येथील अक्षय संजय क्षीरसागर वय २२ व त्याचा चुलतभाऊ सुयोग बंडू क्षीरसागर हे दोघे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लोणंद गावातील म्हस्कोबा देवाचे यात्रेनिमित्त लोणंद गावातून देवाचा पोशाख घेऊन येत असताना फटाके वाजवण्याचे कारणावरून फिर्यादीचे वस्तीवरील सागर नामदेव क्षीरसागर व शुभम तुकाराम क्षीरसागर यांनी संगममत करून फिर्यादी अक्षय क्षीरसागर व त्याचा चुलतभाऊ सुयोग या दोघांना लाथा बुक्यांनी, दगडाने तसेच लोखंडी राॅडने मारहाण केली असल्याची तक्रार अक्षय याने लोणंद पोलीसात दाखल केली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार नितिन भोसले करत आहेत.
To Top