खंडाळा ! घरात घुसून दांपत्यास मारहाण : लोणंद पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद येथील सुंदरनगर येथील महिलेला व तिच्या पतीला घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून मारहाण व घरातील साहीत्याची मोडतोड केल्याची फिर्याद लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे.

याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, लोणंद येथील सुंदरनगर येथे राहत असलेल्या सारीका रमेश जाधव वय ३२ , यांना व त्यांचे पती रमेश जाधव यांना रविवार दिनांक २६ रोजी रात्री सात ते नऊ वाजताच्या दरम्यान फिर्यादी सारीका रमेश जाधव यांच्यात शेजारील महिला कविता तावरे यांचे साहित्य न दिल्याचे कारणावरून वैशाली पवार राह ठोंबरे मळा लोणंद, युवराज धुमाळ रा. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा व तीन अनोळखी इसम यांनी घरात घुसून फिर्यादी सारीका जाधव व त्यांच्या पतीला डोळ्यात चटणी टाकून युवराज धुमाळ याने लोखंडी गजाने पाठीत हातापायावर मारहाण करून जखमी केले असून घरातील टीव्ही डायनिंग टेबल व घरातील लावलेली बुलेट मोटर सायकल MH 12 GW 0758 चे तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद लोणंद पोलीसांत दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन भोसले करत आहेत.
To Top