सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी मुरूम ता . बारामती येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील १४१ विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील साकारले.
न्यू इंग्लिश स्कूल मुरूमचे प्राचार्य संजय कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धेचे आयोजन केले होते .सुंदर व सुबक असे विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीने आकाश कंदील तयार केले .त्यात प्रामुख्याने गाईड कॅप्टन सविता कांबळे यांच्या स्काऊट गाईडच्या पथकाने सहभाग घेऊन सुबक आकर्षक असे आकाश कंदील तयार केले या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकांनी मार्गदर्शन केले छोटा गटात इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये प्रथम क्रमांक शिवरत्न माहुरकर .द्वितीय क्रमांक मीजबाह इनामदार तृतीय क्रमांक आदित्य शिंदे तर मोठ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी मध्ये प्रथम क्रमांक श्रावणी सर्जे ,द्वितीय क्रमांक रागिनी खंदारे ,तृतीय क्रमांक समृद्धी उगले स्काऊट गाईड विभागात क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक ओंकार पेटकर ,द्वितीय क्रमांक शिंदे पूजा ,तृतीय क्रमांक पृथ्वीराज जगताप या सर्वांचे कौतुक करण्यासाठी मुरूम गावचे सरपंच आदरणीय संजय कुमार शिंगटे .पत्रकार सुनील निंबाळकर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सविता कांबळे , शबाना सय्यद, स्वाती टेंगले, सस्ते शितल सुरज कोरडे ,नितीन शिंदे .विनोद भोईटे तसेच कर्मचारी बाळूकाका चव्हाण आदी उपस्थित होते.