बारामती ! 'त्यांनी' आपली आयुष्यातील ३० वर्ष देशाची सेवा करण्यात घालवली : गावाने जंगी मिरवणूक काढत केला जाहीर सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
करंजेपूल (ता. बारामती) येथे सेनादलातून निवृत्त होऊन गावाकडे परतलेले सुभेदार ताराचंद शेंडकर यांचे ग्रामस्थांनी व आजी माजी सैनिक संघटनेने जंगी मिरवणूक काढून स्वागत केले.
            परिसरातील मान्यवरांनीही सेनादलात तीस वर्ष सेवा केल्याबद्दल शेंडकर यांचा उपस्थित राहून सन्मान केला. करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत शेंडकरवाडीसारख्या छोट्या वस्तीवरील जवळपास पंचवीस जण सेनादलाचे जवान आहेत. सैनिक सेनादलातून निवृत्त झाला की त्याचे जंगी स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नितीन शेंडकर, प्रशांत शेंडकर यांचे जंगी स्वागत केले होते. यानंतर आजी माजी सैनिक संघटना बारामती तालुका यांच्या भरीव योगदानामुळे ही परंपरा आता परिसरातील अन्य गावांमध्येही रूजू लागली आहे. १९९३ साली सेनादलातील ईएमई या विभागात ताराचंद शेंडकर रूजू झाले. सुभेदार या पदापर्यंत मजल मारल्यानंतर तीस वर्षांनी देशातील विविध सीमांवर सेवा बजावून ते निवृत्त झाले. त्यांच्या स्वागतप्रित्यर्थ आधीच परिसरात फ्लेक्स उभारले गेले. बुधवारी ते विमानाने पुण्यात उतरून सायंकाळी करंजेपूल येथे पोचले. सजविलेल्या जीपमधून पारंपारिक वाद्यांच्या तालावर त्यांची सहकुटुंब मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील युवकांसोबतच सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, युवराज चव्हाण, युवराज जगताप, रवींद्र कोरडे, किरण सोरटे, ज्ञानेश्वर कुंभार, अनिल चौधरी आदींनी संयोजन केले. मिरवणूक सोमेश्वर कारखान्यावरील शिवपुतळ्यापर्यंत नेण्यात आली. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वर काऱखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व राजहंस पतसंस्थेचे महाव्यवस्थापक विजयकुमार सोरटे यांच्या हस्ते शेंडकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, माजी संचालक रूपचंद शेंडकर, सोमेश्वर शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, विलास शेंडकर उपस्थित होते.
To Top