सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच जोरदार वादाने चर्चेत आलेल्या कोऱ्हाळे खुर्द गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून सरपंच पदासाठी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, माजी सरपंच गोरख खोमणे यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास प्राप्त करू असा आशावाद व्यक्त केला आहे. श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.
दुसरीकडे माजी सरपंच धनंजय खोमणे व राहुल सुकुमार खोमणे यांनीही जोरदार प्रचार चालवला असून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व गावात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी जनतेने संधी देण्याची मागणी ते करत आहेत. श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलकडून आशाताई शरद खुडे सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत तर सोमेश्वर परिवर्तन पॅनेल कडून वैशालीताई विठ्ठल पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. गेली पंधरा वर्षे गोरख खोमणे यांची गावावर एकहाती सत्ता आहे. मात्र सध्या ते बाहेर असल्याने त्याचा काय परिमाण होतोय हे पाहावे लागेल.
.........
COMMENTS