सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
निरा शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व शिवशक्ती ग़मिणबिगर सहकारी पतसंस्था मर्यादित निरा यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक़मास शिक्षक आमदार जयंत आजगावकर शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बरकडे सविता बरकडे निरा गावचे सरपंच राजेश काकडे पिसुर्टी गावचे उपसरपंच दत्तात्रय बरकडे प़दिप बरकडे संजय चोरमले दिपक बरकडे संस्था संचालक सुहास काकडे विद्या क्षिरसागर आप्पा काळे अनेक मान्यवर उपस्थित होते शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था शाळा बाह्य मुलांसाठी व वंचित गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते तसेच जेष्ठ नागरिक सन्मान सैनिक सन्मान आदर्श शिक्षक सन्मान वृक्षारोपण असे अनेक उपक्रम संस्था राबवत असताना संस्थेने गेली २० वर्षे सातत्य राखल्याचे राजेंद्र बरकडे यांनी सांगितले असता आमदार जयंत आजगावकर यांनी यांनी सामाजिक कामाने ध्येय वेडी झालेली मानसच समाजाला वेगळा आदर्श घालून देत असतात जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा चालु असताना चे आनंद अश्रू सर्वांना भाराऊन टाकत होते उपस्थित जेष्ठ नागरिक शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले प़स्ताविक संस्था सचिव सविता बरकडे यांनी केले तर सुत्रसंचलन नम़ता कामतकर यांनी केले आभार सतिश काळे यांनी मानले.