सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक, तर ५ ग्रामपंचायतींच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यापैकी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. इतर १२ गावांत काही ठिकाणी दुरंगी, तर काही गावात तिरंगी लढत होऊ घातली असून, तगड्या पॅनलची रचना करून गावची सत्ता अबाधित ठेवा, असा फतवाच आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पी.डी.सी. बॅंकेची अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे व भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांच्यासह स्थानिक नेत्यांनी दिल्याने ऐन थंडीत तालुक्यातील वातावरण गरम झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुरंदर तालुक्यात पक्षीय राजकारणाला अधिक महत्त्व असल्याने आपल्याच गटाची सत्ता ग्रामपंचायतीत कशी राहील यासाठी तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यानंतर जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभेची निवडणूक होणार असल्याने मोठ्या गावात 'आपला व्होल्ट' तयार करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. रुसवेफुगवे काढताना मात्र नेत्यांची दमछाक होत असून, तांबड्या- पांढऱ्या रस्स्यात तो मुरवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत, तसेच बहुतेक गावांत हाय व्होल्टेज लढती पाहावयास मिळणार, कुणावर गुलाल पडणार, हे मात्र ६ नोव्हेंबरला समोर येणार आहे.
कर्नलवाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सुवर्णा तानाजी महानवर व अहिल्याबाई शंकर वाघापुरे यांच्या लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण दिपक रामचंद्र भोसले, अनिल गणपत निगडे, सर्वसाधारण महिला राखीव आशा सचिन चव्हाण, प्रियंका रणजीत निगडे, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रतिक्षा रामचंद्र गदादे, प्रतीक्षा सागर महानवर. प्रभाग २ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण नंदकुमार वसंतराव निगडे, अशोक ज्ञानेश्वर निगडे व मेघराज सुधाकर निगडे. सर्वसाधारण महिला राखीव स्वप्नाली विराज निगडे, अनिता सत्यवान निगडे. प्रभाग ३ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण अरविंद गुलाबराव निगडे, कपिल मारुती कोंडे, सर्वसाधारण महिला राखीव अनिता जगन्नाथ कर्णवर, अलका अरविंद कर्णवर यांच्यात लढत होणार आहे.
गुळूंचे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ सदस्यांच्या जागांसाठी ३९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले होते. बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे २१ अर्ज व सरपंचपदासाठीचे ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १९ व सरपंच पदासाठी ३ अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
गुळूंचे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निर्मला उत्तम निगडे, सम्राज्ञी कौस्तुभ निगडे व सीमा विजय निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग १ मधुन सदस्य पदासाठी नागरिकांचा मागासवर्ग महिला शितल शेखर कर्णवर, पौर्णिमा महेश गायकवाड, सर्वसाधारण महिला हेमलता हणुमंत निगडे, वंदना सोमनाथ मुळीक, सर्वसाधारण किरण प्रल्हाद निगडे, दिपक आनंदराव निगडे. प्रभाग २ मधुन अनुसूचित जाती नितीन जयंत गायकवाड, ज्ञानेश्वर शंकर पाटोळे, सर्वसाधारण महिला कविता शंकर निगडे, रेश्मा तानाजी निगडे, सर्वसाधारण अक्षय विजय निगडे, गणेश नथुराम निगडे, तानाजी बजाबा निगडे. प्रभाग ३ मधुन नागरिकांचा मागासप्रवर्ग निखिल उत्तमराव खोमणे, वैशाली राजेंद्र फरांदे, सर्वसाधारण महिला राखीव अमृता नितीन निगडे, आरती भगीरथ निगडे, मनिषा अनिल निगडे, वैशाली राजेंद्र निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
गुरवार (दि. २६) पासुन निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. शुक्रवारी (०३) प्रचार सांगता झाली असून रविवार (दि.०५) रोजी मतदान होणार आहे तर सोमवार (दि.०६) रोजी सासवड येथे मतमोजणी होणार आहे.
--------------------------
रविवारी (दि.५) होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी झाली. गेली आठ दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. यावर्षी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, स्टिकर, उमेदवारांचे ओळख व चिन्ह असलेली पत्रके, वचननामा, चारचाकी वाहनांवर स्पिकर लावुन उमेदवार व चिन्ह पटवून देण्यासाठी मोठी कसरत झाली. विशेषत घरोघरी जाऊन उमेदवारांनी मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदाना करण्याचे आवाहन केले.
-------------------------
१५ पैकी १२ गावांत रणधुमाळी-------
वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, तर एखतपुर-मुंजवडी या ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या असून, गुळुंचे, कर्नलवाडी, बागदरवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी या गावांत सार्वत्रिक, तर पाच गावच्या प्रत्येकी एक सदस्यांसाठी पोटनिवडणूक होत आहे. पांढे येथे २ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नायगाव, पानवडी येथे १ अर्ज आल्याने व राख येथे माघारीच्या दिवशी १ अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर सुपे खुर्द येथे एक ही अर्ज आला नाही.
COMMENTS