सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर - हेमंत गडकरी
मूढाळे ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज अपक्षांनी जोरदार प्रचार करत निवडणुकीत रंगत आणली होती. सुरुवातीच्या काळात दोन तुल्यबळ गटात असलेली लढत आता तिरंगी होताना दिसत आहे.
सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने महेश सकाटे सरपंच पदासाठी नशीब आजमावत आहेत. या पॅनेलचे नेतृत्व सागर वाबळे करत आहेत. तर पंचायत समितीचे माजी सभापती, अनुभवी मनोहर वाबळे यांनी मेहमान गटाची जोरदार बांधणी करत मुर्ढेश्वर परिवर्तन पॅनेलच्या वतीने जयपाल साळवे या बौद्ध समाजातील युवकाला सरपंच पदाच्या रिंगणात उतरवले आहे.
सुरुवाती पासून या दोन गटात थेट दुरंगी लढत होण्याची चिन्हे असताना पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क व कोरी पाटी असलेल्या शांताराम साळवे या तरुणाने होम टू होम प्रचार यंत्रणा राबवल्याने प्रस्थापित गटांना धक्का बसला आहे. शांताराम साळवे हे विनम्र सामाजिक कार्यकर्ते असून गावातील सर्व समाजात त्यांचा चांगला जनसंपर्क, स्वच्छ प्रतिमा, पत्रकारितेच्या माध्यमातून केलेली सामाजिक कामे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. समोर येऊन लोक उघडपणे त्यांचे समर्थन करत नसले तरी त्यांच्या रुपाने एक नवीन पर्याय लोकांसमोर आला आहे. प्रस्थापित गटांना वैतागलेल्या लोकांना आता नवा आश्वासक चेहरा शांताराम साळवे यांच्या रूपाने पुढे आल्याने दोन्ही गटाची मात्र चांगलीच कोंडी झाले आहे.
याशिवाय नितीन पोटे हे सुद्धा अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
COMMENTS