खंडाळा ! लोणंद येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी 
खंडाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी गणेश केसकर यांनी आज दि  १६ पासून लोणंद येथील नगरपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

सकल धनगर समाज खंडाळा तालुक्याच्या वतीने खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे शक्ती स्थान असलेले लोणंद येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून ,ज्योत पेटवून ,पायी रॅली काढून लोणंद नगरपंचायत च्या पटांगणात सकल धनगर समाज खंडाळा तालुक्याच्या वतीने गणेश केसकर यांच्या आमरण उपोषणास सुरवात करण्यात आली.

या रॅली मध्ये मोठया प्रमाणावर धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं , कोण म्हणता देत नाही.. घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देण्यात आल्या .

धनगर समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गातील आरक्षण दिलेले आहे. त्याची आज अखेर अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी चौंडी येथे धनगर समाजाचे काही समाज बांधवांनी आमरण उपोषण केले त्यावेळेस सरकारने ५० दिवसाचा अल्टीमेटम दिला होता त्याचीही मुदत पूर्ण झालेली आहे.

धनगर आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उपोषणे, आंदोलने करण्यात येत आहेत, त्याला प्रतिसाद देण्यासाठी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने गणेश केसकर हे आमरण उपोषण करण्यासाठी बसले आहेत.

यावेळी मा. सभापती रमेश धायगुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके सर, शिवाजीराव शेळके ,हनुमंत शेळके , सुरेश शेळके, ॲड. वैभव धायगुडे , हर्षवर्धन शेळके, पवन धायगुडे, महादेव शिंदे, सर्फराज बागवान, रमेश कर्णवर, शंभूराजे भोसले, नवनाथ धायगुडे , ज्ञानेश्वर भिसे, संदीप शेळके, डॉ. मकरंद डोंबाळे,  डॉ अविनाश शेळके, डॉ दीपक गोरड, लक्ष्मण शेळके, रोहन धायगुडे, दीपक जाधव, कय्युम मुल्ला, आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top