भले शाब्बास ! बारामती तालुक्यातील थोपटेवाडीच्या गाईची बेंगलोर येथील दुध स्पर्धेसाठी निवड : तब्बल साडेसहा लाखाला गाईची विक्री

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे नजीक थोपटेवाडी येथील यमुना डेअरी फार्मचे संचालक अविरत संभाजीराव पानसरे यांच्या संकरित गाईंची कर्नाटक प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मिंग असोसिएशनचे , प्रमुख पृथ्वी गौडा आणि रघु रविचंद्र यांनी फार्मला भेट देऊन गाईची दुग्ध उत्पादनाची पाहणी केली व  सदर गाई त्यांच्या कर्नाटक प्रोग्रेसिव्ह फार्मिंग असोसिएशनच्या प्रदर्शन व गोवंश उत्पन्नासाठी निवड केली. 
    सदर गाईची ६ लाख ५१ हजार रुपये किंमत निर्धारित केली. अविरत पानसरे हे गेले दहा वर्षापासून दुग्ध व्यवसायामध्ये असून, आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांचा गोठा पूर्णपणे अत्याधुनिक असून, मिल्किंग पार्लर व खाद्य देण्याची सिस्टीम ही त्यांनी स्वतः त्यांच्या अनुभवातून तयार केलेली आहे. परिसरातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या युवकांसाठी आदर्श आहेत. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या इतर युवकांना ते मार्गदर्शन करत असतात. स्वतःचे अॅग्रीकल्चर व डेअरी डिप्लोमा हे शिक्षण आहे या यशप्राप्तीमध्ये मोलाची साथ देणारे स्वतःचे कुटुंब व मित्रपरिवार यांचेही सहकार्य आहे, हे त्यांनी त्या वेळी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात किमान शंभर गाईंचा फार्म उभारणीचे काम लवकरच चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
To Top