सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील बाबुर्डी अंतर्गत ढोपरेमळा येथील शेतकऱ्याची २० हजार किमतीचे दोन पशुधन ( बोकडे ) चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या सुपे पोलिसांनी आवळ्याची घटना सोमवारी रात्री घडली.
महेश मनोहर भंडलकर ( वय २३ ), फारुख सदृदिन शेख ( वय २२ दोन्ही रा. काऱ्हाटी ता. बारामती) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, ढोपरेमळा येथील शेतकरी भागचंद नंदाराम कुमावत यांच्या गोठ्यातुन दोन पशुधन ( बोकडे ) चोरल्याची घटना सोमवारी ( दि. २० ) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस हवालदार शितोळे, पोलीस शिपाई तुषार जैनक, होमगार्ड काळभोर व नवले आदींनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन मंगळवारी ( दि.२१ ) दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्यांच्याकडुन चोरलेले २० हजार किमतीचे दोन पशुधन ( बोकडे ) ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. या दोघांना बुधवारी ( दि. २२ ) बारामती प्रथमवर्ग न्यायलयात हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार भाऊसाहेब शेंडगे करीत आहे.
पाटील यांच्याशी संपर्क साधला असता चोरट्यांकडुन पशुधन चोरलेले अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली.
..................................