Baramati News ! बेकायदेशीर कोचिंग क्लासेस विरोधात बारामतीत 'त्या' युवकाचे पुन्हा उपोषणाचे हत्यार : प्रशासकीय अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बेकायदेशीर कोचिंग क्लासेस विरोधात बारामतीत मोहसीन पठाण याने पुन्हा उपोषण सुरू केले असून प्रशासकीय अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप उपोषणकर्ते मोहसीन पठाण यांनी केला आहे. 
          8 ऑक्टोंबर 2023 रोजी पठाण यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बारामतीतील बेकायदेशीर खाजगी क्लासेस बंद व्हावी म्हणून आमरण उपोषणास बसले होते. 13 ऑक्टोंबर 2023 ला गटशिक्षणाधिकारी बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी बारामती नगर परिषदेचे अग्निशामक अधिकारी उपनिरीक्षक वाहन परिवहन अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या समवेत मीटिंग घेऊन 13 ऑक्टोंबर 2023 मीटिंगमध्ये ज्या खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना फायर ऑडिट किंवा फायर एनओसी नाही ते बंद करायचे आदेश कार्यकारी दंडाधिकारी साहेबांनी दिले. अग्निशामक अधिकारी यांनी 17 ऑक्टोबर पासून कारवाई सुरू करण्यात अशी आश्वासन दिले पण त्याची पूर्तता न करता विषय जाणीवपूर्वक पंधरा दिवस कुठलीही कारवाई केली नाही त्यानंतर मोजून चार खाजगी कोचिंग क्लासेस सील केले व बंद करून तेच कोचिंग क्लास पुन्हा दोन दिवसात चालू केले म्हणून पठाण यांनी पुन्हा १६ नोव्हेंबर 2023 पासून पुन्हा प्रांत अधिकारीला समोर उपोषणास बसले आहेत.  यामध्ये 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत चक्री उपोषण चालू आहे तसेच मागणी अशी आहे की जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हाधिकारी पुणे शिक्षण आयुक्त पुणे महाराष्ट्र जीएसटी कमिशनर पुणे लेबर कमिशनर पुणे या लोकांनी ह्या सर्व कोचिंग क्लासेस वर बंद करून जोपर्यंत पत्र मला देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याचे मोसीन पठाण यांनी सांगितले. 
-------------------
गटशिक्षणाधिकारी म्हणतात ही माझ्या कार्यक्षेत्रात येत नाहीत जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणतात हे माझ्या कार्यक्षेत्रात येत नाहीत शिक्षण आयुक्त बघायची भूमिका घेतात माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी या कोचिंग क्लासेस बंद करा म्हणून गेल्या काही महिन्यांपूर्वीच आदेश दिले आहेत तसेच 13 ऑक्टोंबर 2023 च्या बैठकीत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाला सरळ बघल दिली जात असल्याचा आरोप मोहसीन पठाण यांनी केला आहे. 
To Top