Breaking ! 'सोमेश्वर'ने पहिली उचल तीन हजार रुपये देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना : संचालक मंडळाच्या मासिक सभेत होणार शिक्कामोर्तब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये इतकी द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
       को-हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे भगत कुटुंबाच्या श्रीराम समूह शेतीस पवार यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या बांधावर संचालक मंडळाशी चर्चा करून ३ हजार रुपये पहिली उचल देण्याच्या सूचना केल्या. सध्याच्या सूत्रानुसार १०.२५ टक्के साखर उताऱ्यावर आधारित ३१५० रुपये प्रतिटन एफआरपी येते. त्यातून मागील दोन आर्थिक वर्षांचा सरासरी ऊस तोडणी खर्च ६९२ रुपये प्रतिटन वजा जाता देय एफआरपी २४५८ रुपये प्रतिटन येते. तर, एकरकमी एफआरपी सूत्रानुसार सुमारे २९५८ रुपये येते. मात्र, सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखान्याशी बरोबरी करत जिल्ह्यात सर्वाधिक ३००० रुपये उचल देणार आहे. याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या मासिक सभेत चर्चा करून यावर शिकामोर्तब केले जाणार असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
To Top