सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
महात्मा गांधी वाचलयामार्फत घेण्यात आलेल्या गौरी सजावटीच्या स्पर्धेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सारीका नारायण पवार यांचा देखावा नंबर वन ठरला असून त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिस देवुन सौ. सारीका पवार यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात आणि या उत्सवा दरम्यान तीन दिवसा साठी येणाऱ्या गौरीसाठी वेगवेगळे देखावे साजरे करून गौरींचे वेगळे पण दाखविण्यासाठी महिला वर्ग प्रयत्नशिल असतो. या कालावधीत महिलांन प्रोच्छाहन मिळावे आणि त्यांनी देखावे साजरे करावेत यासाठी महात्मा गांधी वाचलयाचे मार्फत सन २३ मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी वाचलय कमिटीमार्फत गौरी सजावट स्पर्धेतील स्पर्धाकांच्या सजावटींची पहाणी करण्यात आली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सारीका नारायण पवार यांनी जुन्या संस्कृतीचे जतन करण्याचा देखावा सादर केला होता. यामध्ये नवरी मुलगी सासरी गेल्यानंतर चुलीवरील स्वयंपाक, धान्य निवडणे, धान्य जात्यावर दळणे, लहान मुलांना सांभाळणे, ग्रंथाचे वाचन करणे, कॉम्युटर युगामध्ये कॉम्पुटरचा वापर करणे याचसह इतर संसार उपयोगी कामे कशा पद्धतीने करते याचा सुंदर ज्वलंत देखावा सौ. सारीका पवार आणि त्यांच्या सुनबाई सौ. सोनाली पवार यांना साकरला होता.
गौरी सजावटीच्या स्पर्धेचा नुकताच बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच नारायण शिंगटे, महात्मा गांधी वाचलयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांच्यासह संचालक मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.