सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
संपूर्ण राज्यात सगळ्यात चांगली रिकव्हरी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कमी टक्के व्याजदराने १०० कोटी मिळवून दिले. माझी संचालक मंडळला विनंती आहे की काट्यात गडबड करू नका, वरच्यावर काटा चेक करा. असा आदेश देत मला शेती आवडते कधी कधी त्रास झाला की असे वाटतं की कुठून औधसा सुचली आणि राजकारणात आलो. अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
ऊस शेती पाहणी करण्यासाठी अजित पवार बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावात पोहोचले होते. श्रीराम शेती उद्योगाचे ऊस उत्पादक शेतकरी विलास भगत व सुनील भगत यांच्या शेताची पाहणी केली. मागच्या हंगामात सत्तर एकरात ५ हजार २०० टन ऊस उत्पादन शेतकऱ्याने घेतले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, राज्यातील ४० तालुके दुष्काळी जाहीर केलं आहेत. आपल्याकडे धरणे आहेत म्हणून जर आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकले. पाऊस कमी पडला मागच्यावर्षी धरणे भरली होती पण यंदा परिस्थिती वेगळी आहे
कऱ्हा नदीचे बंधारे भरण्यासाठी काहीतरी उपाय योजना करावे लागतील. असे सांगत यंदा वीर धरण भरून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीवरील बंधारे भरले नाहीत. तर दुसरीकडे दर मिळावे या मागणीसाठी खा. राजू शेट्टी यांनी त्यांच्या भागातील कारखाने बंद ठवले होते. तीन हजार रुपयांनी पहिले पेमेंट काढावे असे मी सांगितले आहे
ऊसतोड मजूर कमी असल्याने कारखाने एक आणि दोन शिफ्ट कारखाने सुरू आहेत. मजूर नाहीत म्हणून आदिनाथ कारखाना अजून सुरूच नाहीत
मजूर आणि वाहतूकदार असे बेजार करीत आहेत की बोलायला नको. ५० आणि ६० टक्के कमिशन घेत आहेत. मला कळत नाही की यांना कारखाने चालवायचे आहेत की नाही?
त्यामुळे याने काय केलं त्याने काय केलं असले बाकीचे उद्योग करण्यापेक्ष शेतीत लक्ष द्या दादाने असे का केलं आशा चर्चा करू नका. मी पण ३०/३२ वर्ष राजकारणात आहे. मी पण उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. ६ तारखेला मी नागपूरला जाणार आहे..लोक उपोषण करतात, गावबंदी करत आहेत. समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या तोंडचे काढून न देता इतर समाजाला कसे देता येईल याचा विचार करतो आहे. त्यासाठी समिती स्थापन केली आहे.
इतर राज्यात आरक्षण मध्ये वाढ केली तसे काही करता येईल का? मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून काय करता येईल. आणि ते सर्वोच्च न्यायालयात कसे टिकेल याचा विचार सुरू आहे.
मोदींच्या विचाराने देश कसा पुढे नेता येईल? राज्यात निधी कसा आणता येईल? समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. २४ नोव्हेंबरला आम्ही निर्णय घेतला. बारामतीतील अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये अन्न उत्कृष्ठता केंद्र उभा करणार आहे. त्यातील ४ कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही कोटी देणार आहे. मिलेट धान्य प्रक्रिया उद्योग सुरू होतील. त्याचा फायदा आगामी काळात आपल्याला होईल. असे मत पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील भगत यांनी केले तर आभार विलास भगत यांनी मानले.
---------------------
दिवाळीच्या काळात डेंग्यू झाला होता म्हणून मी कुणाला भेटलो नाही. मला डेंग्यू झाला मला डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितले होते. काहीजण असे म्हणाले की मला राजकीय आजार झाला. पळ काढायचा नसतो त्याला सामोरे जावे लागते.
अजित पवार : उपमुख्यमंत्री
COMMENTS