सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
फलटण ग्रामीण पोलीस हद्दीतील सुरवडी गावच्या हद्दीत दिनांक १७ नोव्हेंबर रोजी बेकायदा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी १५ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरवडी गावाच्या हद्दीत फलटण लोणंद रोडवरील कमिन्स कंपनीच्या पश्चिमेकडील मोकळ्या जागेत दि. १७ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बैलगाडा शर्यत भरवत लम्पी या संसर्गजन्य चर्मरोगाचा प्रसार करण्यात कारणीभूत होणारी कृती करत तसेच बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक कोणतीच परवानगी न घेता व बैलांचा छळ होईल अशी कृती केल्याबद्दल रवींद्र तायाप्पा चौगुले, संभाजी बिराप्पा केंगार, तुषार सोमनाथ करे, सोनू दगडे , सुरेश बाळासाहेब जाधव , वैभव खंडेराव जाधव , स्वप्निल संजय जगदाळे , अजित मल्हारी जाधव , कोंडीराम बापू जावळे, सुहास रोहिदास जाधव , गणेश दत्तात्रय मदने , मंगेश बन्याबा जाधव, अविनाश दत्तात्रय जाधव , सागर काशिनाथ मदने व दादा मदने अशा पंधरा जणांविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल सुरज काकडे यांनी फिर्याद दाखल केली असून फलटण ग्रामीण पोलीसात वरील पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सपोनि सुलगे, हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल सुरज काकडे, कुंभार व देशमुख यांनी भाग घेतला. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार व्ही आर सूर्यवंशी करत आहेत.
COMMENTS