सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चोपडजच्या सरपंचपदी रुक्मिणी बारिकराव पवार यांची निवड झाली आहे. सरपंच पुष्पलता जगताप आणि एक सदस्य अपात्र ठरल्यानंतर सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी नुकतीच निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम देस्टेवाड यांच्या रुक्मिणी पवार मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी सरपंच पदासाठी मनीषा संदीप भोसले आणि रुक्मिणी बारीकराव पवार या उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. यात पवार यांना पाच तर भोसले यांना चार मते मिळाली, अशी माहिती ग्रामसेविका दिपाली लडकत यांनी दिली. निवडणुकीनंतर रुक्मिणी पवार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सागर गायकवाड, समीर गाडेकर, अॅड. इम्रान खान, अजर तांबोळी, उमेश गायकवाड, मच्छिंद्र निंबाळकर, सुधीर गाडेकर, पांडुरंग कोळेकर, जयश्री गाडेकर, स्वाती यादव उपस्थित होते.