सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे येथे भरवण्यात आलेल्या सीबीएसई सायन्स एक्झिबिशन मध्ये रिजनल लेवल, सायन्स अँड एन्व्हायरमेंट या प्रयोगात बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील एस.डी .सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इयत्ता ७ वीतील विद्यार्थी देवेंद्र अनंत सकुंडे व श्रेया दौलत खंडाळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या प्रयोगाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली असून पुढील स्पर्धा दिल्ली येथे पार पडणार आहे.
या सायन्स एक्झिबिशन साठी 96 शाळांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, मुख्याध्यापक अजित वाघमारे, उपमुख्याध्यापिका अनुराधा खताळ , शाळेतील सर्व शिक्षक वृंद,विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुजा परांजपे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
COMMENTS