सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी
गुठाळे ता खंडाळा येथे मानवी हाडांचे अवशेष आढळले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणे याठिकाणी अकस्मात मयत दाखल करण्यात आलेले होते.
घटनास्थळाची पाहणी करता घटनास्थळाच्या आजू-बाजूस मिळून आलेले लेडीज सॅन्डल, कपडयांची बॅग व त्यामधील खाजगी कंपनीचा गणवेष यावरुन मिळालेले साहित्याची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेवून मानवी हाडांचे अवशेष है शिरवळ येथील मयत युवती
मनिषाकुमारी जिमदार महतो वय १९ वर्ष मुळ रा. मांझी मियापट्टी माझी सारन जि. छपरा राज्य बिहार हल्ली रा. शिरवळ ता खंडाळा जि. सातारा हिचे असल्याचे तिचे नातेवाईकांनी ओळखले. यावेळी सदरील घटनाही घातपात असण्याची शक्यता गृहीत धरुन शिरवळ पोलीसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध अंगाने तपास करीत असताना घडलेली घटना हि मयत युवती मनिषाकुमारी जिमदार महतो वय १९ वर्ष मुळ रा. मांझी मियापट्टी माझी सारन जि. छपरा राज्य बिहार हल्ली रा. शिरवळ ता खंडाळा जि. सातारा हिचे बिहार येथील गावातील युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे कारणातून व गावात बदनामी होत असल्याने मयत युवती मनिषाकुमारी तिचा भाऊ याला सदरील प्रेमसंबंध पसंत नसल्याचे कारणातून मयत युवती मनिषाकुमारी महतो हिचा स्कार्पने गळा आवळून खुन केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यावरुन शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमधील गुठाळे ता खंडाळा जि. सातारा याठिकाणी दि. १६/१२/२०२३ रोजी मानवी हाड्यांचे अवशेष आढळून आले होते. त्यानुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, यांनी शिरवळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक.सी.व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक. शंकर पांगारे,. सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार संजय धुमाळ,जितेंद्र शिंदे, सचिन बीर, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ शंकर जिमदार महतो (वय 24,सध्या रा.पळशी ता.खंडाळा) याला शिरवळ पोलीसांनी अटक केली असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबतचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
या घटनेचा अधिक सपोनि. सी.व्ही. केंद्रे हे करीत आहेत. सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे समौर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS