सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
संपुर्ण पुरंदर व बारामती तालुक्यातील ३२ गावांचे कार्यक्षेञ असलेल्या नीरा कृषि उत्पन्न बाजार समितीत कांदा बाजार सुरू करण्यासाठी व्यापारी सकारात्मक असून लवकरच कांदा बाजार सुरू करणार असल्याची ग्वाही पुरंदरचे आ.संजय जगताप यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी ( दि.२७)सकाळी दहा वाजता
आ.संजय जगताप व ग्रामपंचायत नीरा -शिवतक्रार यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यापारी व ग्रामस्थ यांच्या चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जि.प.माजी सदस्य सुदामराव इंगळे, सोपानकाका बँकेचे व्हा.चेअरमन रमणिकलाल कोठडिया, पुणे नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे,
नीरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रा.प.सदस्य अनिल चव्हाण, अनंता शिंदे, राधा माने, माधुरी वाडेकर, यांच्यासह
नीरा बाजार समितीचे संचालक राजकुमार शहा, अशोक निगडे, राजेंद्र जैन, शांतिकुमार कोठडिया, मनोज शहा आदी व्यापारी उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, कांदा व्यापा-यांशी प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली . यापुढे नीरा बाजार समितीच्या पदाधिका-यां शी चर्चा करून पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून नीरा बाजार समितीत व्यापा-यांना संरक्षण , वीज,
यासारख्या सुविधा देऊन कांदा बाजार सुरू करणार आहे.
यावेळी नीरा बाजार समितीचे संचालक राजकुमार शहा, शांतिकुमार कोठडिया आदी व्यापा-यांनी नीरा बाजार समितीच्या अडचणी मांडल्या.
स्वागत उपसरपंच राजेश काकडे यांनी केले तर आभार सरपंच तेजश्री काकडे यांनी मानले.
-----------------------------------------------------------
नीरा बाजार समितीत एम.डी नेमणार - आ.जगताप
नीरा बाजार समितीचा कारभार वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून लवकरच एम.डी.ची नियुक्ती करणार असल्याचे आ. संजय जगताप म्हणाले.
--------------------------------------------------------------
COMMENTS