Baramati News ! किरण आळंदीकर यांना दत्त दिगंबर चॅरिटेबल ट्रस्टचा 'धर्म भूषण' पुरस्कार प्रदान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांना 
औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) येथील दत्त दिगंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा " धर्म भूषण " पुरस्कार आणि सन्मान पत्र देऊन गौरवन्यात आले.
          याप्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर सद्गुरू दत्तात्रय दहिवाळ महाराज यांचेसह जगद्गुरू, द्वारकापीठ शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जगद्गुरू संत गजानन दादा शास्त्री,परमपूज्य संत गरीबदास महाराज, ( राजस्थान ) परमपूज्य संत हरिगिरी महाराज          (गुजरात) हे यावेळी उपस्थित होते. तसेच औरंगाबाद जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सन्मानित केले, यावेळी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे मुख्य सचिव सुधाकर धानोरकर, असोसिएशनचे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सोपानराव मुंडलिक व त्यांचे सहकारी, उद्योगपती.मधुकरराव टाक, उपस्थित होते,
To Top