सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील कवयित्री दिपाली आनंद गायकवाड लिखित 'वादळवाट कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
निंबुत समता हॉल फरांदेनगर येथे पार पडला. 'वादळवाट' म्हणजे वास्तवातील दुःखाला निर्भयपणे सामोरे जाण्याची क्षमता या कवितेत आहे .अपेक्षा , उपेक्षा ,स्वप्न ,एकाकी पण , जीवनातील वेगवेगळे अनुभव , अशा अनेक विषयांवर दिपाली गायकवाड यांनी वादळवाटेच्या रूपाने मराठी काव्य क्षेत्रात प्रथमच टाकलेल्ं दमदार पाऊल आहे . कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी डॉ. देविदास वायदंडे, प्रा. संजू जाधव, अजिंक्य सावंत, अजित वाघमारे, गुलाब गायकवाड़, अँड. हेमंत गायकवाड़ विशाल हंगिरे , (PSI)मयुरी सावंत, सुनिता सस्ते, दीपक जाधव, सविता वायदंडे व सहकारी शिक्षक ,ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाच्या वेळी देविदास वायदंडे सरांनी दिपाली गायकवाड यांच्या जीवनातील संघर्ष व पुस्तक लिहिण्यामागील त्यांची प्रेरणा याविषयी माहिती सांगितली .तसेच अजिंक्य सावंत यांनीही दिपाली गायकवाड यांचे अभिनंदन केले .
दिपाली गायकवाड यांनीही त्यांच्या वादळवाट कवितेतील कविता फक्त कल्पना विश्वात रमणाऱ्या नसून वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या असून एकाकी प्रवासात शब्दांची ओढ आणि स्वर्गवासी पती आनंद गायकवाड यांची इच्छा व आप्तजनांची साथ त्यांना महत्त्वपूर्ण वाटते याविषयी माहिती सांगितली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता हंगीरे व ज्योती शेवडे यांनी केले.