सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आज संचालक मंडळाच्या मासिक सभेत घेण्यात आला.
तसेच जानेवारीपासून कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासदांना या तीन हजार रुपयांच्या उचलीसोबत प्रोत्साहन अनुदानही देण्याचा निर्णय घेतला आहे, १५ डिसेंबरला सभासदांच्या खात्यावर पहिली उचल जमा करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
चालू गळीत हंगामात ३ लाख २५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून जानेवारी नंतर तुटणाऱ्या उसाला तीन हजार रुपयांच्या उचलीसह प्रोत्साहन अनुदानही देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये जानेवारी मध्ये तुटणाऱ्या उसाला टनाला ७५ रुपये, फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला टनाला १०० रुपये तर मार्च व एप्रिल मध्ये तुटणाऱ्या उसाला १५० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३-२४ मध्ये उसलागवड करणाऱ्या तसेच २०२४-२५ मध्ये गळीतास येणाऱ्या पूर्वहंगामी, सुरू व खोडवा या उसाला पूर्वहंगामीसाठी टनाला ७५ रुपये तर खोडवा साठी टनाला १०० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
COMMENTS