सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे शिवसेनेचा पदाधिकाऱी मेळावा नुकताच सासवड येथे पार पडला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये पुरंदर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये निरा येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते दयानंद चव्हाण यांची पुरंदर तालुक्याच्या उप तालुका प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, तालुका कार्याध्यक्ष भूषण ताकवले यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS