सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार आज गुरुवार दि. 21/12/2023 रोजी बारामती तालुका सह.खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी.विक्रम आनंदराव भोसले रा.वाणेवाडी तर व्हा.चेअरमनपदी .सोनाली दादासो जायपत्रे रा.मुढाळे यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली.
तसेच ही निवडणूक बिनविरोध झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी .मिलिंद टांगसाळे यांनी जाहीर केले.