सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे नीरा मोरगाव राज्य मार्ग लगत असणाऱ्या गुळूंचे येथील रत्नकुमार बापूराव गायकवाड रा. गुळूंचे ता. पुरंदर यांच्या नीरा मोरगाव रोड लगतच असणाऱ्या शेतातील विहिरीवरील सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटर व सौरऊर्जेच्या प्लेटा अज्ञाताने केबल सहित चोरून नेल्याची फिर्याद निरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
मागील काही महिन्यांमध्ये एक मोठी बाजारपेठ असणाऱ्या निरे मध्ये मोटरसायकल चोरांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला होता. जेजुरी व निरा पोलीस स्टेशन ने प्रयत्न करून मोटरसायकल चोरांना गजाड करण्यात यश मिळवले. परंतु आत्ता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर वरती डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 16 रोजी गायकवाड आपल्या शेतामध्ये असणाऱ्या कांदा व ऊस पिकाची रात्रीची लाईट असल्याकारणाने रात्रभर जागून भिजवून काढले व दिनांक 18 रोजी शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता विहिरीवर असणाऱ्या सौरऊर्जेच्या प्लेटा व विहिरीमधील तीन एचपी ची मोटर केबल सहित चोरी गेल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने नीरा पोलीस स्टेशनची संपर्क साधून चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली. अधिकचा तपास नीरा पोलीस स्टेशन करीत आहे.
COMMENTS