सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
पुणे - मिरज लोहमार्गावरील पुरंदर तालुक्यातील निरा येथील रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेकडील मस्जिद , लोकवस्ती व शेतक-यांच्या शेतीकडे जाण्या- येण्या
साठीचा गावच्या सर्व्हे नंबरच्या नकाशातील रस्त्याचे आधी रेल्वेच्या हद्दीतून भुयारी मार्ग करा तरच रेल्वे ट्रँकचे काम करा अशी मागणी 'निरा येथील ग्रामस्थांनी रेल्वेच्या डेप्युटी - सी -चिफ इंजिनिअर यांच्याकडे केली.
निरा येथील रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे १२५ वर्षापासून ,पिढ्यानं पिढ्या मुस्लिम बांधवांची प्रार्थनास्थळ असलेली मस्जिद, विविध जाती धर्मातील राहणा-या रहिवाशांची लोकवस्ती तसेच ब-याच शेतक-यांची निरा नदीकाठी शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी निरा गावच्या सर्व्हे नंबरच्या नकाशातील ' नावेचा डोव्हा कडे' जाणारा पुर्वपरंपरागत, पिढ्यांन पिढ्यां पासून रस्ता आहे.तेंव्हापासून मुस्लिम बांधव मस्जिदीकडे जाण्या- येण्यासाठी तसेच लोक वस्तीवरील रहिवाशी व शेतकरी जाण्या-येण्यासाठी नकाशातील सर्व्हे नंबरच्या रस्त्याचा वापर करीत आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने नविन रेल्वे ट्रँक टाकण्यासाठी सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे. माञ रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईन च्या पश्चिमेकडे पुर्वपरंपरागत,पिढ्यानपिढ्यांपासून असणारी मस्जिद, लोकवस्ती व शेतक-यांच्या जाण्या- येण्याच्या रस्त्याचा विचार न करता रस्ता बंद करून काम सुरू केले आहे. तसेच संबंधित रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्याच जागेत हद्द कायम करीत आहे.त्यामुळे मुस्लिम बांधव, लोकवस्तीवरील रहिवाशी व शेतकरी संतप्त झाले आहेत.त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडमुठेपणाच्या भुमिकेला निरा येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
गुरूवारी ( दि.२१) रेल्वेचे डेप्युटी सी चिफ इंजिनिअर मोहित सिंग, सिनिअर सेक्शन इंजिनिअर, शकील अहेमद शेख, राजेंद्र कुलकर्णी यांनी रेल्वे ट्रँकची पाहणी करून संबंधित रहिवाशी, मुस्लिम बांधवांकडून रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे , उपसरपंच राजेश काकडे यांनी निरा रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडील मस्जिदकडे , लोकवस्तीवर व शेतीकडे जाण्या साठी सर्व्हे नंबरच्या नकाशातील रस्त्याचे रेल्वेच्या हद्दीतून पहिल्यांदा भुयारीमार्ग काढा तरच रेल्वे ट्रँक करा अशी ग्रामस्थांची असलेल्या मागणीला रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भुयारी मार्ग करावा . तसेच पिंपरेखुर्द येथून रेल्वेच्याहद्दीतून निरा नदी पर्यंत होत असलेला रस्ता तातडीने रेल्वेच्या हद्दीतून करण्याची मागणी केली.
ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे यांनी रेल्वेचे डेप्युटी सी चिफ इंजिनिअर मोहित सिंग यांना निरा गावातून जाणा-या 'नावेच्या डोव्हा' कडे जाण्याचा रस्त्याचे जुन्या नकाशातील रस्ता पुराव्यानिशी दाखवून रेल्वेच्या हद्दीतून भुयारी मार्ग काढण्याची मागणी केली.
यावेळी हाजी सद्रुद्दीन शेख, अनंता शिंदे,
योगेंद्र माने, दयानंद चव्हाण, सिकंदर शेख, नदीम सय्यद, मुन्ना डांगे, अमीर पठाण, जलील काझी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, निरा ग्रामस्थांच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत डेप्युटी चिफ इंजिनिअर मोहित सिंग व साळुंखे
यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
--------------------------------------------------------------
निरा ग्रामस्थांच्या मागण्या
*रेल्वे प्रशासनाने अगोदर रेल्वेेच्या हद्दीतून भुयारीमार्ग काढावा.
*रेल्वे प्रशासनाने नविन रेल्वे ट्रँकचे काम करण्यापुर्वी शासकीय मोजणी करून हद्द कायम करावी.
* रेल्वे प्रशासनाने पिंपरेखुर्द येथून नीरा नदीपर्यंत चा रस्ता रेल्वेच्या हद्दीतून तातडीने करावा
* रेल्वे प्रशासनाने निरा गावच्या हद्दीत काम करताना प्रथम ग्रामपंचायत प्रशासनासह स्थानिक रहिवाशांना पु्र्व कल्पना देऊन कोणते काम करणार आहे याची कल्पना द्यावी.
--------------------------------------------------------------
COMMENTS