सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातून महाडच्या दिशेने रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे चारचाकी वाहनातून हातभट्टी दारूचे ३५ लिटरचे तीन हत्ती (कँड) वाहून नेताना शुक्रवार दि.१५ भोर पोलिसांनी छापा टाकून वाहन तसेच चालकासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी मारुती सुझुकी झेन (एमएच१२ एफ ००५२) कार मधून हातभट्टी दारूचे ३५ लिटरचे हत्ती वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाली.तात्काळ भोर पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव ,हवालदार धर्मवीर खांडे , अतुल मोरे ,विकास लगस उद्धव गायकवाड ,दत्तात्रय खेंगरे यांनी सापळा रचून महाडकडे जाणाऱ्या संबंधित संशयित वाहनाची तपासणी केली असता ३ हातभट्टी दारूचे ३५ लिटरचे हत्ती आढळून आले. पोलिसांनी चार चाकी वाहनासह ३० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विकास सुरेश रेपावत वय -४० रा. कापुरहोळ.ता.भोर यास अटक केली.आरोपीस कोर्टात हजर केला असता एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली.