सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावर हॉटेल अमृता शेजारी अज्ञात वाहनाच्या धडकेने एक तरुण ठार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता हॉटेल शेजारी पुणे सातारा महामार्गावर राहुल नथुजी भुरे (वय३१वर्ष,) राहणार देसाई कंपनी, मुळगाव पवनी ता. पवनी जि.भंडारा, यांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. भुरे हे कामाला देसाई कंपनीमध्ये होते. सदर अपघात रोड क्रॉस करताना झालेला आहे. या अपघाताने पुणे सातारा महामार्गावर दूरपर्यंत वाहनाच्या लांब रांगा होत्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व राजगड पोलिस घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी भोर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास राजगड पोलीस करत आहे.
COMMENTS