सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मासाळवाडी ता. बारामती येथील शेततळयामध्ये दोन्ही हात लाल रंगाचे ओढणीने बांधुन विवाहतेला पाण्यात बुडवुन जीवे ठार मारले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नामदेव बबन करगळ वय 45 वर्षे धंदा शेती व मेंढपाळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाउसाहेब महादेव गडदरे रा मासाऴवाडी ता बारामती जि पुणे, ठकुबाई महादेव गडदरे रा मासाऴवाडी ता बारामती जि पुणे, आशा सोनबा कोकरे रा कुतवऴवाडी ता बारामती जि पुणे, सोनबा चंदर कोकरे रा कुतवऴवाडी ता बारामती जि पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
दि. 24/12/2023 रोजी मासाऴवाडी भगवान बिरा गडदरे यांचे शेतातील शेततऴ्यात मयत सुरेखा भाउसाहेब गडदरे हिचे हात पाय बांधून मारल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, फिर्यादी यांची मुलगी सुरेखा भाउसाहेब गडदरे हिस तिचे पती भाउसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे, नंनद.आशा सोनबा कोकरे, नंदावा सोनबा चंदर कोकरे यांनी शाररीक व मानसिक छळ,जाचहाट,त्रास दिलेला असुन तिचे पती भाउसाहेब महादेव गडदरे सासु ठकुबाई महादेव गडदरे यांनी मासाळवाडी येथील तिचे घराचे जवळ असलेले शेततळयामध्ये दोन्ही हात लाल रंगाचे ओढणीने बांधुन पाण्यात बुडवुन जीवे ठार मारले आहे. पुढील तपास पोसई लवटे वडगाव निंबाऴकर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.