सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे- मिनल कांबळे
वेल्हे तालुक्यातील पाबे ते पुणे रस्त्यावरील खड्डे त्वरित भरा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिला आहे, नुकतच रस्त्यांच्या दुरावस्थेत बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेलाडी ते वेल्हे रस्त्यावर दापोडे येथे आंदोलन करण्यात आले येथील रस्त्यावर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व वेल्हेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले होते त्यानंतर ताबडतोब बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले तर आत्ता पाबे ते पुणे या रस्त्याची दुरावस्था झाली असून ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरील खड्डे व रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केली आहे येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाबे ते वेल्हे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, रवींद्र घाडगे अंकुश दसवडकर संदीप दिघे,ज्ञानेश्वर भुरुक दत्ता शेंडकर विकास भिकुले सुनील रेणुसे विनायक लिम्हन, अमोल गायकवाड, चंद्रकांत चव्हाण,धनंजय रेणुसे, राजू झांजे, अमित दसवडकर,उपसरपंच दत्ता कदम आधीसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते