सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यास २५ डिसेंबर पासून 'कोयता बंद'ची केला जाईल असा इशारा ऊसतोड व वाहतूक संघटनांनी दिला आहे.
ऊस तोडणी वाहतूकदार मुकादम यांचा ऊसतोडणी भाव वाढी साठी संप सुरु आहे. ऊसतोडनी संघटना व साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात 2020-2023 ह्या 3 वर्ष करार झालेली मुदत संपली आहे, त्या नंतर नवीन करार करण्या साठी साखर संघा सोबत 3 बैठका पण झाल्या आहेत, पहिल्या बैठकी मध्ये 7 टक्के दुसऱ्या बैठकी मध्ये 24 टक्के, तिसऱ्या बैठकी मध्ये 27 टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे,
मात्र ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटनानी त्त्यांची 100 टक्केच्या मागणी वरून आता ते 50 टक्के भाववाढ झाली पाहिजे या मागणी वर आले आहेत. ऊसतोडणी मजुरांना 237 रुपयांवरन आता 273 रुपये एवढी टनाला तोडणी दिली जाते. या मध्ये खूप मोठी तफावत आहे, दुसऱ्या शेजारील राज्यात पण महाराष्ट्रा पेक्षा ऊसतोडणी व वाहतुकीचे दरा मध्ये खूप मोठी तफावत आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मजूर दुसऱ्या राज्यात ऊसतोडणी, वाहतुकी साठी जात आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रातील सगळे कारखाने मजुरा अभावी पाहिजे तेवढा उसपुरवठा करू शकत नाहीत, महाराष्ट्रातील 50 टक्के कारखाने 24 तासा पैकी 8-10 तास ऊसा अभावी बंद ठेवावे लागत आहेत, त्या मुळे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असलेला साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम संघटना यांच्यात जो संप चालू त्या साठी लावद आहे, लवादा मध्ये पूर्वी ऊसतोडणी च्या बाजूने गोपिनाथ मुंडे व साखर संघाच्या बाजूने शरद पवार होते व आता पंकजा मुंडे व जयंत पाटील हे लवादामध्ये आहे,
जर 27 टक्केवरून व 50 टक्के वाढ न केल्यास ऊस संघटनांनी 25 डिसेंबर पासून "कोयता बंद" ची हाक दिली आहे.