भोर ! आमदार संग्राम थोपटे भोरच्या विकासाचे वारे - युवानेते अनिल सावले : नेरेत दीड कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विकास हाच ध्यास मनी धरून आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात विकास गंगा वाहत आहे.म्हणूनच भोर तालुक्याच्या विकासाची वारे आमदार थोपटे असल्याचे प्रतिपादन युवानेते अनिल  सावले यांनी मंगळवार दि.१९ केले.
     नेरे ता.भोर येथे झालेल्या १ कोटी २७ लाख रुपयांच्या जलजीवन योजनेतील १ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे तसेच हनुमान मंदिर सभामंडपाच्या ५ लक्ष रुपयांच्या भूमिपूजन प्रसंगी सावले बोलत होते. सावले पुढे म्हणाले जलजीवन योजनेच्या माध्यमातून नेरेतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचे काम होणार आहे तर गावच्या विकासासाठी आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून पुढील काळात विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.यावेळी सरपंच उज्वला बढे ,उपसरपंच राजेंद्र चिकणे ,सदस्य सोपान सावले, दिलीप पाटणे, बायडाबाई मांढरे, अनिता शेलार ,बाजार समिती संचालक शिवाजी पाटणे, विकाचे चेअरमन दत्तात्रय सावले, दशरथ सावले,गोपाळ उभे,तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा बढे, प्रकाश मैद,मिलिंद मसवडे,शाम सावले,कांता पवार,शिवाजी बदक,रमा सावले, रेश्मा म्हस्के,पप्पू पाटणे,मंगल बढे,रेश्मा परब,शालन कदम उपस्थित होते.
To Top