बारामती ! सोमेश्वर कारखान्याने बारामती व पुरंदरच्या दुष्काळी पट्ट्यातील ऊस तोडीस प्राधान्य द्यावे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे.  
भारतीय जनता पार्टी बारामती तालुका व पुरंदर तालुका यांच्या वतीने या बारामती व पुरंदरच्या दुष्काळी पट्ट्यातील ऊस तोडीस प्राधान्य द्यावे अशा आशयाचे निवेदन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यादव यांना देण्यात आले.   
     ‌     पुरंदर तालुक्यातील गुळूंचे राख कर्नलवाडी   नावळी  कोळ विहीर मावडी या भागातील तसेच बारामती तालुक्यातील जिरायती भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे शेतीला पाणी तर नाहीच परंतु जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे यामुळे या भागातील ऊस तोडीस प्राधान्य देण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा चिटणीस संजय निगडे यांनी कारखाना प्रशासनाकडे केले आहे.  
  यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी बारामती तालुका अध्यक्ष प्रकाश जगताप किसान मोर्चा चिटणीस पुरंदर तालुका पी एल निगडे, उपाध्यक्ष सुरेंद्र जेधे इत्यादी उपस्थित होते. सदर निवेदनावर सकारात्मक चर्चा व  प्रतिसाद देऊन कार्यकारी संचालक यांनी चेअरमन व संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये विषय घेतो असे आश्वासन दिले
To Top