सोमेश्वर रिपोर्टर टीम.....
नीरा : विजय लकडे.
पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्यावतीने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जि. प. प्राथमिक शाळा निंबुत येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये लोकनृत्य, वकृत्व, भजन, कबड्डी खो-खो, धावणे उंच उडी, लांब उडी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन निंबूत गावच्या सरपंच निर्मला काळे व उपसरपंच अमरदिप काकडे यांचे हस्ते करण्यात आले तसेच बक्षीस वितरण समारंभ सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या विद्यादेवी काकडे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बनसोडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा शितल जाधव पोलीस पाटील साळवे. बासा काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ननवरे दिपाली, संभाजी काकडे निंबूत केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
ग्रामपंचायत निंबूत च्या वतीने सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना चषक देण्यात आले तसेच केंद्रप्रमुख तावरे साहेब यांच्या वतीने सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेसाठी बा.सा. काकडे माध्यमिक विद्यालय निंबुत व जि. प. प्राथमीक शाळा निंबूत या दोन्ही शाळांचे सहकार्य लाभले. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व उपशिक्षकांचेही या स्पर्धेसाठी योगदान लाभले