सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील इंद्रजित भोसले यांची भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे आणि अंकिता पाटील जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी वैभव सोनवलकर, सरचिटणीस युवा मोर्चा पुणे जिल्हा भाजपा साकेत जगताप, उपाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा, प्रकाश जगताप अध्यक्ष भाजपा बारामती तालुका उपस्थित होते.