सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी( ता. बारामती) येथील मयुरी महादेव सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत थेट पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. तब्बल पाच वर्ष या यशासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली.
राज्यात मुलींमधून तिने बारावा क्रमांक पटकावला आहे. सतत अभ्यास, प्रचंड परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने तिने हे यश मिळविले आहे. मयुरी हीने आपले पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी येथे पूर्ण केले. तर मेकॅनिकल इंजिनिअर पदवी माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ येथे पूर्ण केले. सन २०१९ पासून तिने पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगले होते. मयुरीचे वडील महादेव सावंत हे सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तसेच ते उत्कर्ष आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आहे गृहिणी आहेत. गुरुवारी(दि.२८) रोजी एमपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वाघळवाडी येथे सावंत यांच्या निवासस्थानी अनेकांनी मयुरी हिचे अभिनंदन केले.